डाळिंबाच्या सालींपासून बनवा केसांचा रंग

नैसर्गिक आणि घरगुती पद्धतीने केसांना रंग देण्याकडे लोकांचा कल आजकाल वाढला आहे. यासाठी डाळिंबाची साल अतिशय उपयोगी ठरू शकते.

डाळिंब खाल्यानंतर उरलेली साल रंग म्हणून वापरता येते. डाळिंबाच्या साली एखाद दिवस सुकवून घ्या. त्या एका कढईत मंद आचेवर भाजून घ्या. त्यात 2 चमचे मोहरीचे तेल, 1 चमचा कलोंजी, 2 चमचे आवळा पावडर टापून हे मिश्रण काळा रंग येईपर्यंत शिजवून घ्या.

हे मिश्रण मिक्सरच्या भांडय़ात ओतून थंड होऊ द्या. त्यानंतर त्याची मिक्सरमधून पातळ पेस्ट तयार करा. हा आहे केसांना लावण्यासाठी नैसर्गिक रंग. हा रंग केसांना लावून तासाभराने केस धुऊन घ्या.