ट्रॅव्हल्स खड्ड्यात पडून 50 होमगार्डस् जखमी

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पुणे येथे गेलेले चंद्रपूर जिह्यातील होमगार्ड परतीच्या प्रवासात असताना नांदेड जिह्यातील श्रीक्षेत्र उनकेश्वरजवळ आज दुपारी 2.10 वाजता खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात 48 होमगार्डसह एकूण 50 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने यवतमाळ जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर जिह्यातून 192 होमगार्ड पुणे येथे पाठविण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे होमगार्ड चार खासगी ट्रॅव्हल्समधून चंद्रपूरकडे परत जात होते. त्यापैकी एक ट्रॅव्हल्स कलवट पुलाजवळ खड्ड्यात कोसळली.