
प्रभास म्हटल्यावर डोळ्यासमोर मस्त लार्जर दॅन लाईफ असलेला असा भव्य दिव्य चित्रपट येतो. परंतु ‘द राजा साब’ने मात्र या सर्व अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. प्रभासने या चित्रपटासाठी तब्बल 150 कोटी मानधन घेतले होते. परंतु हा चित्रपट मात्र 100 कोटी देखील कमाऊ शकला नाही. त्यामुळेच आता प्रभासची जादू ओसरली की काय असा प्रश्न पडू लागला आहे.
प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट समाधानकारक कमाई करु शकला नाही. समीक्षकांसह प्रेक्षकांनी देखील या चित्रपटावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. मूळातच ‘द राजा साब’ची पटकथा ही लक्ष वेधून घेणारी नसल्याने, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. प्रभासच्या या चित्रपटाने गाजावाजा फार मोठा केला होता. परंतु यातील सर्व हवा ही अवघ्या पाच दिवसात गेली.
प्रभासचा चित्रपट ‘द राजा साब’ बॉक्स ऑफिसवर अतिशय वाईट स्थितीत आहे. परंतु मारुती दिग्दर्शित, या तेलुगू हॉरर-कॉमेडी चित्रपटाला थिएटरमध्ये चांगली सुरुवात झाली होती. परंतु आठवड्याभरातच या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. द राजा साब हा 2026 मधील सर्वात बिग बजेट चित्रपटांपैकी एक होता. मारुती दिग्दर्शित हा चित्रपट 9 जानेवारीला जगभरात प्रदर्शित झाला. ‘द राजा साब’ ने बॉक्स ऑफिसवर फार दमदार सुरुवात केली नाही. आत्तापर्यंत अवघ्या दोन आठवड्यांमध्ये केवळ 100 कोटींची कमाई झालेली आहे. दुसऱ्या रविवारी तर या चित्रपटाला प्रेक्षकच नव्हते अशी परिस्थिती होती. ‘द राजा साब’ रिलीज होऊन 10 दिवस झाल्यानंतरही अजूनही 150 कोटींच्या घरात नाही. या चित्रपटाचे बजेट हे 400 कोटी असून, या चित्रपटाचे निर्माते दिवाळखोरीत निघाले आहेत.


























































