
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवतीर्थावर पार पडलेल्या बैठकीमध्ये, नगरसेवकांच्या गटनेता पदासाठी यशवंत किल्लेदार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासह सर्व नवनियुक्त नगरसेवक देखील उपस्थित होते. गटनेतापदी सर्वानुमते यशवंत किल्लेदार यांची निवड झाल्याची बातमी किल्लेदार यांनी माध्यमांना दिली. तसेच पक्षाकडून कोणत्याही प्रकारचं प्रतिज्ञापत्र घेतले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेले आहे.
प्रभाग क्रमांक 192 मधून मनसेचे यशवंत किल्लेदार विजयी झाले होते. मिंधे गटाच्या प्रीती पाटणकर यांचा त्यांनी 1 हजार 425 मतांनी पराभव केला होता. यशवंत किल्लेदार हे शिवसेना भवनाच्या प्रभागातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.



























































