भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड

नितीन नबीन यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. बिहारचे माजी आरोग्यमंत्री नितीन नवीन हे नड्डांकडून पदभार स्वीकारतील आणि भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतील.

पक्षाकडून जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नबीन हे उमेदवारपदी होते. एकूण ३७ जागांसाठी नामांकने प्राप्त झाली होती आणि सर्व वैध आढळली. पक्षाचे निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले की, इतर कोणतेही नामांकन दाखल झाले नसल्याने नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. नितीन नबीन (२० जानेवारी) रोजी पदभार स्विकारणार आहेत.

भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस, बिहार युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, छत्तीसगडचे प्रभारी आदी सर्व संघटनात्मक पातळीवरील जबाबदाऱ्या नितीन नवीन यांनी प्रभावीरित्या हाताळल्या आहेत.