U19 World Cup – बुलबुलियाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेची मुसंडी, दुबळ्या संघाला चोपून काढलं

ICC Men’s U19 World Cup 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी भरीव कामगिरी करत विरोधी संघाच्या बत्या गुल केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 5 गड्यांच्या मोबदल्यात स्पर्धेतील सर्वाधिक 397 धावा चोपून काढल्या. प्रत्युत्तरात टांझानियाचा संघ पत्यांसारखा कोसळला आणि अवघ्या 68 धावांवर संघ बाद झाला.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मुहम्मद बुलबुलिया याने 108 धावांची आणि जॅसन रोल्स याने नाबाद 125 धावांची विस्फोटक खेळी केली. दोघांनी मिळून संघासाठी 201 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. त्यामुळे आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात स्पर्धेतील सर्वोत्तम 395 धावा केल्या. डोंगरा एवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना टांझानियाची त्रेधातिरपीट उडाली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या घाताक माऱ्यापुढे टांझानियाचा निभाव लागला नाही. हजेरी लावून फलंदाज एकामागे एक परतत होते. अवघ्या 69 या धावसंख्येवर टांझानियाचा संपूर्ण संघ बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने 329 धावांनी मोठा विजय साजरा केला. रॉल्स आणि माजोला याने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.