शुभमन गिल रणजी खेळणार

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्यानंतरही हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल माघार घेण्याच्या मानसिकतेत नाही. विश्रांतीचा पर्याय साफ फेटाळत गिलने थेट देशांतर्गत क्रिकेटकडे मोर्चा वळवला असून, गुरुवारपासून तो राजकोट येथे सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत गिलच्या बॅटमधून मोठी खेळी निघाली नसली तरी, त्याने या अपयशावर विश्रांतीचे मलम लावण्याऐवजी रेड-बॉल क्रिकेटमध्ये स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी-20 विश्वचषकासाठी निवड न झाल्यामुळे गिल रणजी रणजीवर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे.