
तळीरामांसाठी दारू म्हणजे अमृतासमान. दारू पिण्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. अशीच तयारी 2 सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या तरुणांनी केली आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये बिअर पिण्याच्या शर्यतीत दोन्ही तरुणांनी भाग घेतला होता. बिअरचे अती सेवन केल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसर, सदर घटना आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात मकर संक्रातीच्या दिवशी घडली आहे. 35 वर्षांचा मणिकुमार आणि 22 वर्षांचा पुष्पराज हे दोघे कंबमवारीपल्ली मंडळातील बंदावड्डीपल्ले गावातील रहिवासी होते. दोघेही चेन्नई आणि बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होते. संक्रातींच्या निमित्ताने दोघेही सण साजरा करण्यासाठी घरी आले होते. दरम्यान गावात बिअर पिण्याची स्पर्धा भरली होती आणि दोघेही या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी झाले असता दोघांनीही अति प्रमाणात दारूचे प्यायली आणि त्यामुळे ते बेशुद्ध झाले. मात्र, त्यांचं हे दारुचे अतिसेवन त्यांच्या जीवावर बेतलं आहे. यामुळे दोघांच्याही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मणिकुमारच्या वडिलांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



























































