
बिग बॉस मराठीचे सहावे सिझन सुरू होताच घरात जोरदार राडे व्हायला सुरुवात झाली आहे. तन्वी कोलते, रुतुजा जामदार, करण सोनावणे, दिपाली सय्यद यांनी गेला आठवडा त्यांच्या भांडणांनी गाजवला. इतकं असूनही अद्याप प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीला हवा तसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजते. त्यामुळे आता टीआरपी वाढवण्यासाठी निर्माते बिग बॉस क्विन राखी सावंत हिला शो मध्ये आणणार असल्याचे समजते. अद्याप त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या मनोरंजन क्षेत्राच्या वर्तुळात ही चर्चा रंगली आहे.
बिग बॉस आणि राखी सावंत हे फार जुनं समिकरण आहे. राखी सावंत ही बिग बॉस हिंदीच्या पहिल्या सिझनमध्ये आली होती. तेव्हापासून राखी सावंत बऱ्याच सिझनमध्ये येऊन गेली आहे. गेल्या वर्षी देखील ती मराठी बिग बॉसमध्ये पाहुणी म्हणून आली होती.
राखी सावंत ही 2006 मध्ये बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून आली होती. बिग बॉस हिंदीच्या 14 व्या आणि 15 व्या सीझन मध्येही तिने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली

























































