
टीम इंडियाचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहली याला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या एक दिवसीय क्रमवारीमध्ये न्यूझीलंडचा आक्रमक बॅटर डॅरेल मिचेल याने विराटला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या एक दिवसीय मालिकेमध्ये न्यूझीलंडने 2-1 असा विजय मिळवला होता. न्यूझीलंडने पहिल्यांदाच हिंदुस्थानमध्येमध्ये एक दिवसीय मालिका जिंकण्याचा कारनामा केला होता. या मालिकेमध्ये मिचेलची बॅट चांगलीच तळपली होती.
न्यूझीलंडचा 34 वर्षीय खेळाडू डॅरेल मिचेल सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. हिंदुस्थानविरुद्ध राजकोटमध्ये झालेल्या लढतीत त्याने नाबाद 131 धावा केल्या होत्या, तर इंदूरमध्ये झालेल्या निर्णायक लढतीत त्याने 137 धावांची खेळी करत संघाला विजयाचे द्वार उघडून दिले होते.
तीन सामन्यांच्या या मालिकेमध्ये मिचेलने तब्बल 352 धावा कुटल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने 845 रेटिंग गुणासह पहिल्या स्थानावर झेप घेतली, तर इंदूरमध्ये शतक ठोकूनही विराट कोहली दुसऱ्या स्थानावर घसरली. विराट कोहली सध्या 795 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Virat Kohli’s reign as the No.1 ODI batter is over as an in-form New Zealander rises to the top 😲
Details 👇https://t.co/G5NUvco7AM
— ICC (@ICC) January 21, 2026
एक दिवसीय क्रमवारीतील टॉप-10 बॅटर
- डॅरिल मिचेल (न्यूझीलंड) – 845 गुण
- विराट कोहली (हिंदुस्थान) – 795 गुण
- इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) – 764 गुण
- रोहित शर्मा (हिंदुस्थान) – 757 गुण
- शुभमन गिल (हिंदुस्थान) – 723 गुण
- बाबर आजम (पाकिस्तान) – 722 गुण
- हॅरी टेक्टर (आयर्लंड) – 708 गुण
- शाई होप (वेस्ट इंडीज) – 701 गुण
- चरिथ असलंका (श्रीलंका) – 690 गुण
- केएल राहुल (हिंदुस्थान) – 670 गुण




























































