इननोवर्टन टेक्नॉलॉजीजने Classview.AI केलं लॉन्च

इननोवर्टन टेक्नॉलॉजीजने Classview.AI या एआय आधारित क्लासरूम इंटेलिजन्स इंजिनच्या लॉन्चची घोषणा केली आहे. शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि दीर्घकाळापासूनची समस्या म्हणजे वर्गखोल्यांमध्ये प्रत्यक्षात काय घडते याबाबत मर्यादित आणि अविश्वसनीय माहिती मिळवणं आहे. Classview.AI या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

शाळांनी शिक्षक प्रशिक्षण, मूल्यमापन आणि बाह्य ऑडिट्स यावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असली तरी, प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर मोजमाप न केलेले, तुटक आणि व्यक्तिनिष्ठ राहिले आहे. Classview.AI ही परिस्थिती बदलण्याचा उद्देश असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. हे प्लॅटफॉर्म प्रत्येक लेक्चरचे सातत्यपूर्ण आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करून वर्गातील घडामोडींना संरचित शैक्षणिक आणि अध्यापनविषयक इनसाइट्समध्ये रूपांतरित करते, ज्याचा उपयोग शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाला होतो, असंही कंपनीचं म्हणणं आहे.