
राज्यात महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर आता 5 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने या कालावधीत होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत विद्यापीठाने आज सायंकाळी परीक्षांचे सुधारित वेळापत्रकाचे परिपत्रक जारी केले आहे. परीक्षांच्या तारखा बदलल्या असल्या तरी परीक्षांची वेळ मात्र तीच राहणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
असे आहे सुधारित वेळापत्रक
मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार 4, 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा अनुक्रमे 17, 18, 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.





























































