
जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुनंदा भागवत फेगडे या महिला उमेदवाराला शून्य मतदान मिळाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्या महिला उमेदवाराचा सरळ आणि साधा प्रश्न असा आहे की, मी स्वतःलासुद्धा मतदान केले नाही का? याचे उत्तर कोण देणार? बामसेफ बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम संपूर्ण देशभरात वारंवार सांगत आहे की, ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी होते, हा त्याचा पुरावा असल्याची प्रतिक्रिया सुनंदा फेगडे यांनी दिली आहे.
‘माझ्या घरातल्या लोकांचे मत जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत तर मी मला दिलं होतं, मग ते मत कुठे गेलं?’ आता या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं, मत मशीनमध्ये गेलं की निकाल भाजपला गेला आणि प्रश्न विचारला की, निवडणूक आयोग शांत. उत्तर मात्र भाजपकडून येते. सरकार, निवडणूक आयोग घटनात्मक, पण स्पष्टीकरण मात्र पक्षीय. आजची लोकशाही अशी झाली आहे की बटन मतदार दाबतो निकाल मशीन ठरवतं आणि खुलासा पक्ष देतो, अशी संतप्त सवाल करत जळगाव प्रभाग (1-अ) मधील अपक्ष उमेदवार सुनंदा फेगडे यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे.
मी स्वतःला मत दिलं होतं, ते मत दिसत नाही. पण आयोग म्हणतो ईव्हीएम मशीन सुरक्षित आहे. भाजप म्हणतो, जनतेचा कौल आहे. मग प्रश्न असा पडतो, फेगडे बाईंचं मत अवैध होतं का की मतदाराचाच कौल आता गरजेचा उरलाय नाही? आज ईव्हीएम मशीनवर प्रश्न विचारणं म्हणजे लोकशाहीवरच संशय घ्यायचा गुन्हा झाला आहे.- सुनंदा फेगडे, अपक्ष उमेदवार





























































