
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळी मारून हत्या करणाऱ्या आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळी घातल्यानंतर या व्यक्तीने गुन्हा कबूल केला होता. 2022 मध्ये पश्चिमी शहर नारामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची हत्या करण्यात आली होती. तेत्सुया यामागामी असे आरोपीचे नाव असून हत्या केल्यानंतर त्याने गुन्हा मान्य केला होता. शिंजो आबे यांनी चर्चला नुकसान पोहोचवण्याचे काम केल्याने संतापाच्या भरात हत्या केली, असे आरोपीने म्हटले.






























































