नेपाळमध्ये चार मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

नेपाळमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली आहे. कार्यवाहक पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील चार मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. नेपाळमध्ये 5 मार्चला निवडणुका होत आहेत. या सर्वांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विज्ञान आणि शिक्षण मंत्री महाबीर पून यांनी राजीनामा दिल्यानंतर म्याग्दी जिह्यातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. याआधी संचार मंत्री जगदीश खरेल आणि क्रीडा मंत्री बबलू गुप्ता यांनीही पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.