
चेहरा सुंदर दिसावा हे प्रत्येकाला वाटते. यासाठी अनेक जण महागडय़ा सौंदर्य प्रसाधनावरील खर्च करतात. परंतु केमिकलयुक्त क्रीममुळे काहींच्या चेहऱयांना नुकसान होते. त्यामुळे चेहरा काळवंडला जातो. चेहरा जर काळवंडला असेल तर चेहरा तजेलदार करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. या सोप्या टिप्स चेहऱयासाठी फायदेशीर ठरू शकतील.
हळद, बेसन पीठ आणि चंदन यांचे मिश्रण करूनफेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहरा तजेलदार दिसू शकतो. झोपण्यापूर्वी टॉमेटो किंवा काकडीचे काप चेहऱयावर काही वेळ ठेवल्यावर चेहरा चमकदार दिसतो. कोरफडीचा गर चेहऱयावर लावल्यास चेहरा सुंदर दिसतो.






























































