
न्यूझीलंडमध्ये एका कॅम्पग्राउंडवर गुरुवारी भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरील माउंट मौंगानुईच्या पायथ्याशी भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनाचा ढिगारा समुद्रकिनाऱ्यावरील हॉलिडे पार्कवर पडला.





























































