
वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेत खेळवा, ही मागणी आयसीसीने फेटाळून लावल्यानंतर आज बांगलादेशने आगामी टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारच्या स्पष्ट भूमिकेनंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) आयसीसीविरुद्ध बंडाचे निशाण फडकवत आपला कठोर निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर आयसीसीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसी बांगलादेशला अपात्र ठरवत स्कॉटलंडला वर्ल्ड कपसाठी पात्र ठरवतात का, या अधिकृत निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























































