
जम्मू-कश्मीरच्या दोडा जिह्यात भीषण अपघात झाला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेसाठी लष्कराच्या जवानांना नेणारे ‘कॅस्पर हे वाहन जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळले. त्यात 10 जवान शहीद झाले असून 11 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बर्फवृष्टीनंतर रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे वाहन घसरले आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जम्मू येथील व्हाईट नाईट कॉर्प्स युनिटने दिलेल्या माहितीनुसार, भदेरवाह-चंबा या आंतरराज्य मार्गावर सुमारे नऊ हजार फूट उंचीवर डोडापासून 55 किलोमीटर अंतरावर खन्नी टॉपजवळ दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

























































