
मुंबईमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेने बांधकामांना घालून दिलेली नियमावली पाळत नसलेल्या तब्बल 106 बांधकामांचे काम तातडीने बंद केले आहे. यामध्ये खासगी बांधकामांसह रेल्वे पूल, ‘एसआरए’ प्रकल्प, ‘म्हाडा’ प्रकल्पांचाही समावेश आहे. तर पालिकेच्या पथकांकडून मुंबईभरात तपासणी सुरूच असून नियम पाळत नसलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्यात येत आहे.
पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी व अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही आणि प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे.


























































