असं झालं तर … हरवलेले मूल दिसले…

जर हरवलेले मूल सापडले तर सर्वात आधी त्या मुलाची सुरक्षितता तपासा. मुलाला काही दुखापत झाली आहे का, तो घाबरलेला आहे का, हे तपासा. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करा.

मुलाला त्वरित पोलिसांच्या किंवा बाल संरक्षण पेंद्राच्या स्वाधीन करा. ते मुलाची योग्य काळजी घेतील आणि पुढील प्रक्रिया पार पाडतील.

पोलीस स्टेशनमध्ये ‘हरवलेल्या व्यक्तीची’ नोंद असल्यास त्यांना माहिती द्या. मुलाला अशक्तपणा, जखमा किंवा इतर काही त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करा.

मुलाचे नाव, पत्ता, आई-वडिलांची माहिती विचारून घ्या. त्याच्या जवळ काही ओळखपत्र आहे का, ते तपासा. आधार कार्डमुळे अनेकदा हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यास मदत होते.

जर मुलाची ओळख पटली तर त्वरित त्याच्या पालकांशी संपर्क साधा. त्यांना मुलाची माहिती द्या आणि त्याला सुरक्षित ठिकाणी भेटायला बोलवा.