
केमिकल्सचा मारा केलेल्या काही भाज्या किंवा फळं आरोग्याला हानीकारक असतात. फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने शेअर केलेल्या माहितीनुसार रताळ्यांना आकर्षक गुलाबी रंग येण्यासाठी त्यावर रोडामाईन बी रंग मारला जात आहे. रताळ्यावर रोडामाईन मारलेलं आहे का, हे जाणून घ्या.
त्यासाठी कापसाचा बोळा पाण्यामध्ये बुडवा आणि त्याने रताळे पुसा. कापसाचा रंग बदलून तो हलका जांभळट, गुलाबी झाला तर ते रताळे भेसळीचे आहे. त्यामुळे रताळे आणल्यानंतर ते काही तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्याचे वरचे आवरण चोळून चोळून स्वच्छ करा आणि मगच पुन्हा एकदा खात्री करूनच रताळे खा.


























































