Gold-Silver Rate – सोने-चांदीतील घसरणीला ब्रेक; पुन्हा उच्चांकाकडे झेप

जागतिक अस्थिरता, अमेरिकेची ग्रीनलँड, इराणबाबतची भूमिका तसेच ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या सर्व जागतिक अशांततेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. सोन्या-चांदीच्या दरात गुरुवारी मोठी घसरण झाल्यानंतर आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या घसरणीला ब्रेक लागला असून त्या पुन्हा उच्चांकाकडे झेपावत आहेत.

वायदे बाजारात गुरुवारी सोन्या- चांदीचे दर घसरल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली होती. मात्र, ती घसरण तात्पुरती ठरली आहे. त्यामुळे नफावसुलीमुळे ही घसरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमकुवत होणारा रुपया, फेडवरील दबाव आणि भू-राजकीय तणाव यामुळे वायदे बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीने विक्रमी पातळी गाठली. गुरुवारी सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. मात्र, शुक्रवारी बाजार सुरु होताच दोन्ही धातूंची जोरदार रिकव्हरी सुरू झाली आहे.

वायदे बाजारात गुरुवारी झालेल्या घसरणीमुळे चांदी त्याचा महत्त्वाचा टप्पा 3 लाखांखाली येण्याची भीती गुतंवणूकदारांना होती. मात्र, शुकर्वारी बाजार सुरु होताच चांदीप्रमाणेच सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आता दोन्ही धातू आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीकडे झोपावत आहेत. वायदे बाजारात शुक्रवारी (MCX) सोन्याचा दर प्रति औंस 4 हजार 964 डॉलर पोहोचला आणि चांदीचा दर प्रति औंस 96.506 वर पोहोचला. म्हणजेच सोन्याच्या दरात 1,874 रुपयांची वाढ होत तो 1,58,220 रुपयांवर पोहचला आहे. तर चांदी 8,348 रुपयांनी वाढ होत तो 3,35,647 रुपयांवर पोहचला आहे.

गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) मध्ये दिवसभर सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली. मात्र, बाजार बंद होईपर्यंत त्यात रिकव्हरी झाली. बाजार बंद होताना चांदीची किंमत प्रति किलो 3,26,500 रुपये झाली तर सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1,56,540 रुपये इतकी झाली होती. तर चांदीच्या ईटीएफमध्ये 20 टक्के घसरण दिसून आली. मात्र, ती घसरण तात्पुरती ठरली आहे. आता शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी पातळीजवळ पोहोचल्या आहेत.