राजकारणात विरोध असू शकतो, पण वैयक्तिक कटुता नसावी; हा संस्कार बाळासाहेबांनी घातला, शरद पवार यांचे अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे.

”बाळासाहेबांनी आपले ठाम विचार आणि निर्भीड ठाकरी बाणा जपताना महाराष्ट्रहिताशी कधीही तडजोड केली नाही. शब्दांची निवड करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. विविध विषयांवर संघर्ष जरी झाला तरी, आपली भूमिका कधी त्यांनी लपवून ठेवली नाही हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. राजकारणात विरोध असू शकतो, पण वैयक्तिक कटुता नसावी; हा संस्कार घालून देणारे रोखठोक व मार्मिक भाष्यकार, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन”, अशी पोस्ट शरद पवार यांनी शेअर केली आहे.