जन्मशताब्दीनिमित्त मान्यवरांनी शिवसेनाप्रमुखांना केले अभिवादन

अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुत्वाचा धगधगता अंगार, मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष  23 जानेवारीपासून सुरू होत आहे. देशभरातून आज सर्व स्तरातून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अशा अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.