
वसंत पंचमीला सकाळी शुक्रवारी दिल्ली एनसीआर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात पाऊस पडला आहे. पावसामुळे तापमान कमी झाले असून गारवा वाढला आहे. तर दुसरीकडे डोंगरपरिसरात बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या पावसामुळे गारवा वाढला आहे. हवामान विभागाने आज हरयाणा, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक भागांना पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ शिमला येथे शुक्रवारी बर्फवृष्टी झाली. ज्यामध्ये तीन महिन्याचा दुष्काळ संपला. शिमला हवामान खात्याने यापूर्वी 23 जानेवारी रोजी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, शिमला, कांगडा, मंडी, सोलन, सिरमौर, बिलासपूर, हमीरपूर, किन्नौर आणि उना येथे यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात मुसळधार पाऊस, गारपीट, थंडी आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


























































