
बारामती येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात पिंकी माळी या तरुणीचा समावेश होता. ती त्यात फ्लाईट अटेन्डेंट म्हणून होती. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव हे अंतिम दर्शनाकरिता तिच्या सासरी कळवा येथे काही वेळ आणण्यात आले होते. यानंतर पुन्हा माहेरी वरळी येथे रवाना करण्यात आले. यावेळी पिंकी माळी हिच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. तर मुलीचं पार्थिव बघताच तिच्या आईने टाहो फोडला. तिच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.
Ajit Pawar Plane Crash – पिंकी माळीच्या कुटुंबियांचा आक्रोश, मुलीचं पार्थिव बघताच आईने टाहो फोडला pic.twitter.com/38Q3xSqpJf
— Saamana Online (@SaamanaOnline) January 29, 2026

























































