
चौथ्या टी-20 सामन्यात हिंदुस्थानला 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला तरी शिवम दुबेची वादळी फलंदाजी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. न्यूझीलंडविरुद्ध 23 चेंडूंत 65 धावांची खेळी करत त्याने अडचणीत सापडलेल्या संघाला सावरले. 4 बाद 63 अशा स्थितीत नंबर सहाला उतरून दुबेने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक इरादे दाखवले.
महान फलंदाज सुनील गावसकर यांनी ही खेळी आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगत 15 चेंडूंत केलेले अर्धशतक ‘खास विक्रम’ असल्याचे सांगितले. दुबे आता फक्त फिनिशर नसून उपयुक्त अष्टपैलू म्हणून उभा राहत असल्याचे मत गावसकरांनी व्यक्त केले. टी-20 विश्वचषकापूर्वी हा हिंदुस्थानसाठी मोठा सकारात्मक संकेत असल्याचे ते म्हणाले.




























































