
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या चाहत्यांसाठी आजची सकाळ धक्कादायक ठरली. विराट कोहलीचे २७० दशलक्ष (२७ कोटी) पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाले होते. ३० जानेवारीच्या सकाळपासूनच विराटचे व्हेरिफाईड प्रोफाइल सर्चमध्ये दिसत नसल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. विराटचे अकाउंट दिसत नसल्याने चाहत्यांनी विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला प्रश्न विचारून भंडावून सोडलं. अखेर या चर्चेनंतर गायब झालेले ते अकाउंट काही तासात रिस्टोअर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
युजर्स विराटच्या प्रोफाइलवर गेल्यावर त्यांना ‘प्रोफाइल उपलब्ध नाही’ (Profile not available) असा संदेश दिसत होता. विशेष म्हणजे, हे अकाउंट का गायब झाले, याबाबत अद्याप विराट कोहली, त्याची टीम किंवा इंस्टाग्रामकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तांत्रिक बिघाडामुळे हे घडले की अकाउंट हॅक झाले आहे, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.
विराटच्या भावाचेही अकाउंट गायब या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे, कारण विराटचा मोठा भाऊ विकास कोहली याचेही इंस्टाग्राम अकाउंट आज सकाळपासून गायब झाले होते. त्याच्याही प्रोफाइलवर तोच तांत्रिक संदेश दिसत होता. दोन्ही भावांची अकाउंट्स एकाच वेळी गायब झाल्याने चाहत्यांच्या चिंतेत भर पडली होती.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
विराटचे इंस्टाग्राम अकाउंट दिसत नसल्याने चाहत्यांनी सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर आपली चिंता व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी अनुष्का शर्माच्या इंस्टाग्राम पोस्टवर जाऊन ‘भाभी, भैय्या का अकाउंट कहा गया?’ अशा कमेंट्स करत विचारणा करण्यास सुरुवात केली होती.
X (ट्विटर) अकाउंट अद्याप सुरू इंस्टाग्रामवर गोंधळ सुरू असताना, विराट कोहलीचे ‘X’ (ट्विटर) अकाउंट मात्र अजूनही सक्रिय होते. विराट नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून लंडनला परतला आहे. दरम्यान, आगामी ‘आयपीएल २०२६’ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (RCB) प्रतिनिधित्व करण्यासाठी तो मैदानात उतरणार आहे.
Virat Kohli’s Instagram Account with 270M Followers Disappears; Fans Worried | Latest Updates
Virat Kohli’s Instagram profile suddenly vanished on Jan 30, leaving fans in shock. With over 270 million followers, the account shows ‘Profile Not Available’. Read why Virat and his brother Vikas Kohli’s accounts are missing.


























































