मोटोरोला सिग्नेचरची हिंदुस्थानात दमदार एन्ट्री

मोटोरालाने आपला लेटेस्ट स्मार्टफोन मोटोरोला सिग्नेचर हिंदुस्थानात लाँच केला आहे. या फोनला तीन स्टोरेजमध्ये आणले आहे. 12 जीबी प्लस 256 जीबी स्टोरेजची किंमत 59,999 रुपये, 16 जीबी प्लस 512 जीबी स्टोरेजची किंमत 64,999 रुपये आणि 16 जीबी प्लस 1 टीबी स्टोरेजची किंमत 68,999 रुपये आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड ऑटो फोकस कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा 3 एक्स टेलिफोटो कॅमेरा दिला आहे.