अ‍ॅमेझॉन 16 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

अ‍ॅमेझॉन हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची तयारी करत आहे. कंपनी पुढील तीन महिन्यांत मोठी कर्मचारी कपात करणार असून या कपातीमध्ये तब्बल 16 हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणार आहे. एका रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉन जवळपास 30 हजार कॉर्पोरेट रोल कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या कर्मचारी कपातीनंतर अ‍ॅमेझॉन वेब सर्विस, रिटेल, प्राइम व्हिडीओ आणि ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होतील. ऑक्टोबरच्या अखेरच्या महिन्यात अ‍ॅमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.