
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचे आदेश सप्टेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आले आहेत. यानंतर राज्यात गेल्या पाच महिन्यांत मराठवाडयात 35 हजार कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल. बीड जिह्यात सर्वाधिक 23 हजार कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली आहेत.
मराठवाडा महसूल विभागातील आठही जिह्यांत कुणबी प्रमाणपत्रांसाठी मोठया प्रमाणत अर्ज प्राप्त होत आहेत. हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कामाचा वेग वाढवा. यासाठी शासकीय यंत्रणेने गावपातळी पर्यंत जाऊन सक्रियपणे प्रयत्न करण्याच्या सूचना मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. मराठवाडयात वाटप करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या कामाचा आढावा घेतला असता गेल्या पाच महिन्यात 35 हजार 160 कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याचे दिसून आले.
छत्रपती संभाजीनगर 1955
जालना 1939
परभणी 1826
हिंगोली 2388
नांदेड 294
बीड 23802
लातूर 241
धाराशीव 2715


























































