
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनदरम्यान नुकताच एक महत्त्वपूर्ण करार झाला. या करारांतर्गत हिंदुस्थानात सुखोई सुपरजेट एसजे-100 विमानाची निर्मिती केली जाईल.
सध्या हैदराबाद येथे ‘विंग इंडिया 2026’ शो सुरू आहे. या सर्वात मोठ्या नागरी हवाई शोमध्ये रशियाचे ‘एसजे-100’ प्रमुख आकर्षण ठरले आहे. सुखोई सुपरजेटच्या परिवारातील, पण बिझनेस आणि व्हीआयपी आवृत्ती असलेले जेट पहिल्यांदाच हिंदुस्थानच्या एव्हिएशन मार्केट मंचावर झळकले आहे.
वैशिष्ट्ये कोणती?
- एसजे-100 सुपरजेट हे व्हीआयपी, कॉर्पोरेट आणि सरकारी प्रवासासाठी डिझाईन केलेले आहे.
- 15 ते 19 व्हीआयपी प्रवाशांची क्षमता.
- मोठे आणि मल्टिझोन केबिन.
- व्हीआयपी लाऊंज, मीटिंग एरिया, रेस्ट रूम, स्पेशल वॉशरूम.
- लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी उपयुक्त.
- आधुनिक तंत्रज्ञान आणि हायस्पीड क्रूझ क्षमता.
- हिंदुस्थानात सरकारी तसेच कॉर्पोरेट टुरसाठी हायएंड चार्टर फ्लाइटची मागणी वाढत आहे. अशावेळी एसजे-100 सुपरजेट्स हे मोठ्या बिझनेस जेट्सच्या तुलनेत खूप परवडणारे ठरेल.
- करारानुसार पुढील दीड वर्षात एसजे-100 ची दहा विमाने हिंदुस्थानात आणली जातील, तर पुढील तीन वर्षांत या सुपरजेटची निर्मिती करण्याचे एचएएलचे लक्ष्य आहे.


























































