
राज्याची आर्थिक परिस्थिती अंत्यत ढासळली आहे. लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थासाठी सरकारी तिजोरीची लूट राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला नेत आहेत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट करत राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी भआजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबरदस्त टोलाही लगावला.
अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही. चंद्रपूरमध्ये काही नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. हे राजकारण अतिशय खालच्या पतळीवर आले आहे. भाजप आणि मिंधे यांच्यात सत्तेचे वाटप अडकले आहे. त्यांच्यात मतभेद आहेत. नगरसवेक निवडून आले आहेत, त्यांना सभागृहात येऊ द्या, त्यांना नेता निवडू द्या. मात्र, कोणी कोणते खाते कोणत्या समित्या घ्याव्या, यावर मतभेद असल्याने, सत्तेचे अद्याप वाटप झाले नसल्याने महापौरांनी निवड ते पुढे ढकलत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये, यासाठी त्यांचे घृणास्पद डावपेच टाकले जात आहेत. विरोधीपक्षनेते पद मिळून न देणे हा हलकटपणा आहे. मात्र, ते सर्व मोदी आणि शहांचे चेले असल्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना शेवटच्या रांगेत बसवणारी भाजप राज्यात विरोधी पक्षपदाचा सन्मान करेल, अशी अपेक्षा करता येत नाही.
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्यासोबत शिवसेनेची सकारात्मक चर्चा झाली आहे. विजय वडेट्टीवार मातोश्रीवर आले होते. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. आमचा संवाद सुरू असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याची आर्थिक परिस्थिती अंत्यत ढासळली आहे. लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थासाठी सरकारी तिजोरीची लूट राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला नेत आहेत. मात्र, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत आता आपल्याला अडचण वाट नाही. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून 36 लाख कोटी घेऊन आले आहेत. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर 36 लाख कोटी मोजण्याचे काम सुरू आहे. ते लवकरच बँकेत भरले जातील, त्यानंतर सर्व आबादी आबाद आहे, असा जबरदस्त टोला त्यांनी लगावला.


























































