Megablock On Mumbai Local – रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक अभियांत्रिकी व देखभाल-दुरुस्ती कामांसाठी घेण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने तेथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ब्लॉकची वेळ

ठाणे-कल्याण दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत; कुर्ला-वाशी दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत.

यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबईहून ठाणे-कल्याणकडे जाणाऱ्या डाउन जलद/अर्ध-जलद लोकल कळवा, मुंब्रा, दिवा येथून धीम्या मार्गावर वळविल्या जातील. अतिरिक्त थांबे घेऊन सुमारे १० मिनिटे उशिरा पोहोचतील. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकलही दिवा, मुंब्रा, कळवा मार्गे वळविल्या जातील.

मेल/एक्सप्रेस गाड्या ५वी आणि ६वी लाइनवर वळविल्या जातील. हार्बर मार्गावर सीएसएमटी-वाशी/बेलापूर/पनवेल आणि परत येणाऱ्या अनेक रेल्वे सेवा रद्द होतील (सकाळी १०.१७ ते १५.४७ पर्यंतच्या).

विशेष व्यवस्था

ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल चालविल्या जातील. हार्बर प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यान १०.०० ते १८.०० पर्यंत प्रवासाची परवानगी. प्रवाशांनी वेळापत्रक तपासून आगाऊ नियोजन करावे, असे रेल्वेने आवाहन केले आहे.