
कर्नाटकची राजधानी बंगळुरुममध्ये एका पाळीव कुत्र्याने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला. कुत्र्याने तिच्या मान, चेहरा, हात आणि पायाचा चावा घेतला. तिच्या मदतीला आलेल्या एका तरुणावरही त्याने हल्ला केला. ही घटना एचएसआर लेआउट टीचर्स कॉलोनीत २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ६:५४ वाजता घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती आणि तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, तिची प्रकृती गंभीर आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर ५० हून अधिक टाके पडले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या कुत्र्याचा मालक अमरेश रेड्डी असून, महिलेच्या पतीने एचएसआर लेआउट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ते साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत आणि हल्ल्याची परिस्थिती निश्चित करण्यासाठी पुरावे तपासत आहेत. कुत्र्याच्या मालकावर पुढील कारवाई काय करायची याबद्दल अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पण लवकरच याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल.
View this post on Instagram


























































