केंद्रीय अर्थसंकल्पात पूर्णपणे फिका आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करणारा – जयराम रमेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्, या अर्थसंकल्पावर काँग्रेसने तीव्र शब्दांत टीका केली असून, हा अर्थसंकल्प पूर्णपणे फिका आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या अर्थसंकल्पावर हल्लाबोल करताना म्हटले की, “केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही दम नाही.”

काय म्हणाले जयराम रमेश?

X वर एक पोस्ट करत अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना जयराम रमेश म्हणाले की, अर्थसंकल्पीय दस्तऐवजांचा सविस्तर अभ्यास करणे अजून बाकी असले तरी, निर्मला सीतारामन यांच्या ९० मिनिटांच्या भाषणानंतर हे स्पष्ट झाले आहे की, या अर्थसंकल्पाबाबत जे मोठे वलय निर्माण करण्यात आले होते, त्या तुलनेत यात काहीही विशेष नाही. हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि पारदर्शकतेचा अभाव असलेला आहे.

ते म्हणाले की, यावेळचे अर्थमंत्र्यांचे भाषण मुळीच पारदर्शक नव्हते. महत्त्वाच्या योजना आणि कार्यक्रमांसाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे, याची कोणतीही स्पष्ट माहिती भाषणात देण्यात आली नाही. केंद्र सरकारने केवळ आकड्यांचा खेळ करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.