
जालन्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. वनविभागाला माहिती देल्यानंतर वनविभागाच पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सतीश टोपे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला. सकाळच्या सुमारास शेतात विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले असता विहिरीमध्ये बिबट्या मोटारच्या पाईपला धरून पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर तात्काळ सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत विहिरीभोवत बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बिबट्या काढण्यासाठी वनविभागाचे अंबड वनपाल बी.एम.पाटील, वन्यजीव बचाव प्रमुख अशिष जोशी, कैलास कदम, गणेश तुपे, शेषेराव राठोड, संतोष राठोड ,गणेश तुपे तात्काळ पाथरवाला येथे दाखल झाले.
वनविभागाच्या कर्मचार्यांनी नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडत विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला जवळपास तासभर शर्थीचे प्रयत्न करून बिबट्या पिंजर्यात जेरबंद करण्यास यश आले. यावेळी सतिश टोपे, अॅड.संभाजी टोपे, रामेश्वर काटकर, विलास काळे, गणपत खरात, हरिभाऊ विटोरे, गणपत खरात, अशोक फुलारे, धनंजय खरात, दिपक टोपे, अविनाश मडके, दिपक फुलारे, अर्जुन काटकर, भगवान काटकर यासह गावातील नागरिकांनी वन विभागातील कर्मचार्यांना मदत केली.


























































