T20 World Cup 2026 – मोठी बातमी! पाकिस्तानचा हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यास नकार, 15 फेब्रुवारी रोजी मैदानात उतरणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व संघ कसून सराव करत आहेत. अशातच पाकिस्तान सराकराने घोषणा केली आहे की, 15 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानविरुद्ध होणारा सामना पाकिस्तान खेळणार नाही. पाकिस्तान स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. मात्र, हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यास पाकिस्तान सरकारने नकार दिला आहे. आयसीसीने यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

पाकिस्तान सरकारने ट्वीट करत पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. परंतू हिंदुस्तानविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात संघ मैदानात उतरणार नसल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.