
हिमाचल प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. संपूर्ण रस्त्यांवर बर्फ असल्याने जणू काही बर्फाची चादर अंथरली आहे असे सर्वत्र चित्र दिसत आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाल्याने डोंगर पांढरेशुभ्र दिसत आहेत. हा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. बर्फ पडल्याने हिरवीगार दिसणारी झाडेही पांढरी दिसत आहेत. शिमला, कुल्लू, मनालीत पर्यटकांची संख्या वाढली आहे. वाहनांवर बर्फवृष्टी झाल्याने गाडय़ाही जागच्या जागी गोठल्या आहेत. हिमाचल प्रदेशमधील बहुतांश परिसर हा बर्फाने झाकल्याने या ठिकाणी जणू काही पांढरे सोने अंथरले आहे, असे मनमोहक दृश्य दिसत आहे. शेकडो पर्यटक हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिकून घेत आहेत.


























































