
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
अजित पवार यांचे बारामतीत एका विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही होते. त्यांच्या पश्चात ही जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदही होते. पण त्यांच्या पश्चात हे पद सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही.
Maharashtra Dy CM Sunetra Pawar has been appointed as the guardian minister for the Pune and Beed districts.
— ANI (@ANI) February 3, 2026


























































