
चीनने म्यानमारमध्ये स्कॅम नेटवर्क चालवणाऱ्या चार गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली आहे. या आरोपींवर चार अब्ज डॉलरची फसवणूक केल्याचा आरोप आहे तसेच सहा लोकांची हत्या होण्याला जबाबदार धरले होते. दक्षिण चीनच्या शेनझेन इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने सोमवारी या चौघांना फाशीची शिक्षा ठोठावली. याआधी गेल्या आठवडय़ात म्यानमारमधील स्कॅम सेंटर चालवल्याच्या आरोपाखाली अन्य 11 लोकांना फाशीची शिक्षा दिली होती. तसेच शेनझेन कोर्टाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाच लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.






























































