
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे.गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या विरोधकांनी केलेल्या टीकेला विक्रांत जाधव यांनी रिलमधून उत्तर देत विरोधकांची बोलती बंद केली आहे.
गेल्या आठ वर्षात गुहागर तालुका आणि असगोली जिल्हापरिषद गटाचा विकास झाला नाही,रोजगार निर्मिती झाली नाही अशी टीका विरोधकांनी केली होती त्या टीकेला जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी रिलमधून कडक उत्तर दिले आहे.जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी पालपेणे येथे केलेली विकासकाने छायाचित्रासहीत मांडली आहेत.पवार साखरी आणि साखरी त्रिशूळ येथील विकासकामे विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत.तरूणांना रोजगार,नोकरी मिळावी म्हणून गुहागरात घेतलेल्या नोकरी महोत्सवाची आठवण करून दिली आहे.पेवे-खरेकोंड मधील विकासकाने छायाचित्रासहित मांडली आहेत.खामशेत मधील विकासकामे,रत्नागिरी जिल्हा परिषदेची भव्य इमारत उभारण्यातला वाटा,कोरोनाच्या काळात आरोग्यसेवेसाठी उपल्बध केलेल्या रूग्णवाहिका हे पाहून केलेली टीका विरोधकांच्या अंगलट आली आहे.आरे,वाकी पिंपळवट,धोपावे,वरवेली आणि तळवली गावातील विकासकामे जनतेसमोर मांडताना भविष्यात संकल्पनाही विक्रांत जाधव यांनी मांडल्या आहेत.






























































