
कुर्ला येथील प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच झाले. ‘जत्रा’ ही स्नेहसंमेलनाची संकल्पना होती. त्यातून महाराष्ट्रातील पारंपरिक संस्पृतीचे दर्शन घडवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भाऊ कोरगावकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे, सामाजिक कार्यकर्ते नपुल पारसेकर, गायक दादुस ऊर्फ संतोष चौधरी आणि नाटय़दिग्दर्शक देवेंद्र पेम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘जत्रा’ संकल्पनेवर आधारित विविध रंगतदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी आदर्श शिक्षक म्हणून वर्षा कारंडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श पालक म्हणून प्रतिभा व किरण मुळीक आणि कल्पना व नागनाथ बनसोडे यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी तसेच शाळेतील कर्मचारी वर्गाचाही गौरव करण्यात आला.
या वेळी संस्थेच्या विश्वस्त शलाका कोरगावकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चिकणे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विशाखा परब, संस्थेचे खजिनदार जयदीप हांडे तसेच संस्थेचे सदस्य नीलेश कोरगावकर आदी उपस्थित होते.




























































