
महापालिकेच्या निवडणुकीनंतर नांदेड पोलीस अलर्ट मोडवर आले असून, मंगळवारी (03 फेब्रुवारी 2026) जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणार्यांविरुध्द तसेच अवैध जुगार व अवैध जनावरे वाहतूक करणर्या इसमावर कारवाई करुन २३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार नांदेड पोलीस आता अलर्ट मोडवर आली आहे. पोलिसांच्या गोपनिय सूचनेनंतर जिल्ह्यात काल सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ३६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे, अवैध जुगार व अवैध जनावरे वाहतूक करणार्या वेगवेगळ्या अड्यावर धाडी टाकून पोलिसांनी ६४ जणांवर कारवाई केली. यात २३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक त्या त्या विभागाचे पोलीस उपअधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखा यांच्या मदतीने हा मास रेड करण्यात आला. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करुन मुद्देमाल जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.






























































