
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज संसदेत भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला. “भाजपसाठी महिला केवळ एक व्होट बँक असून, महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्या भाजप आणि आरएसएसनं गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात एकाही महिलेला अध्यक्ष केलेलं नाही,” अशा शब्दांत खरगे यांनी सरकारला धारेवर धरलं. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना ते असं म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “मोदी सरकार महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गोष्टी करतं, पण प्रत्यक्षात त्यांनी महिला आरक्षण विधेयक अटींच्या जाळ्यात अडकवून ठेवलं आहे. जर सरकारची नियत साफ असेल, तर जनगणनेची वाट न पाहता हे विधेयक त्वरित लागू करावं.”
ते म्हणाले की, “१०० वर्षांपूर्वी जेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, तेव्हा काँग्रेसने सरोजिनी नायडू यांची अध्यक्षपदी निवड केली होती. इंदिरा गांधी यांच्या रूपानं देशानं कणखर महिला नेतृत्व पाहिलं. मात्र भाजपनं आजवर एकाही महिलेला पक्षाध्यक्ष बनवलेलं नाही.”
खरगे म्हणाले की, “”मोदी सरकारने आणि संघ परिवारानं सुरुवातीला जातीनिहाय जनगणनेला विरोध केला, पण विरोधकांच्या आंदोलनामुळे सरकारला गुडघे टेकावे लागले. मात्र अद्याप या जनगणनेचा कोणताही स्पष्ट रोडमॅप सरकारकडे नाही.” गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारनं सामाजिक न्यायाची रचना कमकुवत केली असून, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार वाढल्याचेही यावेळी ते म्हणाले आहेत.
VIDEO | Parliament Budget Session 2026: Rajya Sabha LoP and Congress President Mallikarjun Kharge says, “It has been 60 years since Indira Gandhi was Prime Minister, and many women became symbols of women’s empowerment during that period. The BJP has not elected a single woman as… pic.twitter.com/acIRtrevd9
— Press Trust of India (@PTI_News) February 4, 2026




























































