आर्मेनिया एअर टू एअर मिसाईल खरेदी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्मेनिया हिंदुस्थानकडून मेड इन इंडिया एअर टू एअर मिसाईल खरेदी करणार आहे. या खरेदीची चर्चा सुरू केली आहे. मे 2025 मध्ये एमके-1 पहिल्यांदा ऑपरेशनल म्हणून तैनात करण्यात आले होते; परंतु याचा वापर करण्यात आला नाही. अस्त्र एमके-1 ला आता आणखी पॉवरफुल बनवले जात आहे. याची सध्याची 110 किलोमीटरची रेंज वाढून 160 केली जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे केले जाऊ शकते. त्यामुळे आर्मेनियाला 160 किलोमीटर रेंजचे उपकरण मिळू शकते. भविष्यात हिंदुस्थान अस्त्र एमके-2वरसुद्धा काम करत आहे. या मिसाईलची रेंज 220 किलोमीटरहून जास्त असेल.