
परदेशातून हिंदुस्थानात येणाऱया प्रवाशांसाठी सीमाशुल्काच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हिंदुस्थानी नागरिकांसाठी शुल्कमर्यादा वाढवून आता 75 हजार रुपये केली आहे. ती आधी 50 हजार रुपये होती. तसेच परदेशातून दागिने आणण्याचे नियमही बदलले आहेत. सोन्याच्या किंमतीऐवजी आता सोने वजनावर हिंदुस्थानात आणता येईल. हे नवीन नियम 2 फेब्रुवारी, 2026 पासून लागू करण्यात आले आहेत. हिंदुस्थानी नागरिक परदेशातून 75 हजारांपर्यंतचे सामान कोणतेही शुल्क न भरता आणू शकतात. महिला प्रवाशाला 40 ग्रॅमपर्यंतचे दागिने आणण्याची मुभा आहे. तसेच 18 वर्षे पूर्ण करणारा व्यक्ती एक लॅपटॉप आणू शकतो. दुसरा लॅपटॉप आणल्यास कस्टम शुल्क भरावे लागेल.




























































