
पश्चिम बंगालच्या कोलकाता विमानतळावर टर्क टर्कीश एअरलाईन्सच्या विमानाचे आज इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. काठमांडूहून इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाच्या उजव्या इंजिनात आग लागल्याचा संशय आल्यानंतर ते आपत्कालीन परिस्थितीत कोलकात्यात उतरविण्यात आले. यानंतर विमानातील सर्व 236 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इस्तंबूलला जाणाया टीएचवाय-727 या विमानाने दुपारी 1.29 वाजता नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले.
इस्तंबूलला जाणाऱ्या टीएचवाय-727 या विमानाने दुपारी 1.29 वाजता नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. चार मिनिटांतच क्रूला उजव्या इंजिनमध्य बिघाड झाल्याचे समजले. या घटनेबद्दल कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काठमांडू ते इस्तंबूल प्रवास करणाऱया विमानाला आपत्कालीन परिस्थितीत विमानतळावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. विमानाच्या कॅप्टनने कोलकाता एटीसीला सांगितले की, उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचा संशय आला होता. यानंतर दुपारी 2 वाजून 49 मिनिटांनी कोलकाता विमानतळावर लॅडिंग करण्यात आले.






























































