एकांकिका ते नाटक: एक प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jab we meta ekankika dahanukar college wins sawai trophy metavers based marathi drama review

सध्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘जब वी मेटा’ या एकांकिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. सर्व नामांकित स्पर्धा जिंकून शेवटी पुण्याच्या सवाई एकांकिका स्पर्धेत ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. गेल्या पस्तीस वर्षांच्या इतिहासात पार्ल्याच्या डहाणूकर महाविद्यालयाने हा मान प्रथमच मिळवला आहे. सर्वेश देसाई लिखित आणि पराग ओझा दिग्दर्शित ही एकांकिका मेटाव्हर्सच्या व्हर्चुअल जगावर भाष्य करते. येणाऱया काळात हे तंत्रज्ञान आपल्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम करणार आहे आणि त्यात तरुणाई कशी होरपळून निघणार आहे याचे विदारक चित्रण यात पाहायला मिळते. विनोदी पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या एकांकिकेत तंत्रज्ञानाची काळी बाजू पाहून अस्वस्थ व्हायला होते.

सध्या या एकांकिकेचे अनेक ठिकाणी प्रयोग होत आहेत आणि नाटय़चित्रसृष्टीतील नामवंत लेखक, दिग्दर्शक त्याला हजेरी लावताना दिसत आहेत. मागच्या वर्षी गाजलेल्या विनोद रत्ना लिखित दिग्दर्शित ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेचे पूर्ण लांबीचे नाटक सध्या रंगभूमीवर जोरात सुरू आहे. ‘जब वी मेटा’च्या नशिबात तसा काही योग आहे का ते लवकरच कळेल.

jab we meta ekankika: dahanukar college wins sawai trophy | metavers based marathi drama review

m.l. dahanukar college’s ‘jab we meta’ wins the prestigious sawai ekankika competition. written by sarvesh desai and directed by parag ojha, this play explores the dark side of metaverse technology.